केंद्र सरकार जीएसटीचे दर वाढवण्याच्या विचारात

0
289

दिल्ली, दि.७ (पीसीबी) – वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू होऊन तब्बल अडीच वर्ष झाली. यादरम्यान केंद्र सरकारने जीएसटीच्या स्लॅबमध्ये अनेक बदल केले. परंतु आता महसूल घटल्याने पुन्हा एकदा जीएसटीचे स्लॅब बदलण्यात येणार असल्याचं म्हटले जात आहे. सध्याच्या ५ टक्क्यांचा जीएसटीचा स्लॅब वाढून ९ ते १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करामधून येणारा महसूल वाढवण्यासाठी जीएसटी काऊंन्सिल १२ टक्क्यांचा स्लॅब बंद करून यादरम्यान येणाऱ्या सर्व २४३ वस्तूंवर १८ टक्के कारण्यावर विचार करू शकते.

जर यावर शिक्कामोर्तब झाले आणि जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यात आले तर याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. जीसटी स्लॅबमध्ये बदल झाल्यास सरकारी तिजोरीत १ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक वाढ होणार आहे. सध्या ज्या वस्तूंवर कोणताही कर आकारला जात नाही त्यावरही कर लावण्यावर विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. सध्या महागड्या रूग्णालयांमधील उपचारांपासून हॉटेलमधील प्रति दिवस १ हजार रूपयांपेक्षा कमी दराच्या बिलांवर कर द्यावा लागत नाही. परंतु यांनादेखील जीएसटी अंतर्गत आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.