केंद्र सरकारच्या निषेधार्थ आकुर्डीतील सीबीआयच्या कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शने

0
868

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – केंद्र सरकार ‘सीबीआय’च्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्यावतीने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीतील सीबीआयच्या कार्यालयासमोर आज (शुक्रवार) निदर्शने  करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे, महिला अध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सरचिटणीस सजी वर्की, मयूर जयस्वाल, माजी महिला प्रदेशध्यक्षा श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, प्रवक्ते गौरव चौधरी, शहाबुद्दीन शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकार हाय हाय, भाजप सरकार हाय, नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, गली गली मे शोर है, चौकीदार चोर है, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी तांबे म्हणाले की, ‘सीबीआयचे संचालक आलोक वर्मा राफेल घोटाळ्याची चौकशी करत होते. त्यामुळे आपली चोरी उघड होण्याच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.