केंद्रीय विहार कॉलनीतील रस्त्यांचे डांबरीकरण; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

0
710

भोसरी, दि. १४ (पीसीबी) –  सेक्टर क्रमांक ४ मधील केंद्रीय विहार कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांना सुरूवात झाली आहे. या कामांबाबत  स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनी  पाठपुरावा केला होता.

केंद्रीय विहार परिसरातील रस्त्यांची दुरूस्ती करण्याच्या सुचना    स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.  तसेच रस्त्यांच्या डांबरीकरण कामासाठी  लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती. हा निधी मंजूर झाल्यानंतर   डांबरीकरणास  सुरूवात करण्यात आली आहे.

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता.  आता या कामांना सुरूवात झाल्याने  नागरिकांमधून समाधान  व्यक्त  केले जात आहे.