केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन

0
1213

बेंगळूरू, दि. १२ (पीसीबी) – केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार (वय ५९) यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता निधन झाले. त्यांना कर्करोगाचा आजार झाला होता. बेंगळूरू येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. बंगळूरूच्या नॅशनल कॉलेज येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

अनंत कुमार हे एक अतिशय चांगले नेते होते. त्यांनी तरूणीपणीच राजकारणात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण निष्ठेने समाजाची सेवा केली. त्यांच्या चांगल्या कामांसाठी ते नेहमीच आठवणीत राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या आहेत.

संरक्षणमंत्री निर्मला सितारामण म्हणाल्या की, भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या निधनाने पक्षामध्ये दुःखद वातावरण आहे. त्यांनी भाजपाची मोठी सेवा केली. बंगळूरू त्यांना नेहमीच आपल्या हृदयात आणि स्मरणात ठेवेल. दरम्यान, दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून अनंतकुमार सहा वेळा निवडून आले आहेत.