केंद्रीय निवडणूक आयुक्तांची बुधवारी पत्रकार परिषद

0
379

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची माहिती देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा  बुधवारी ( दि.१८) पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, निवडणुकीची घोषणा करणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पथक राज्यातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आज (मंगळवार) राज्यात आले आहे. निवडणुका जाहीर करण्यापूर्वी हे पथक दोन दिवस राज्य सरकार,  महाराष्ट्र पोलिस, रेल्वे, आयकर विभाग, उत्पादन शुल्क आणि इतर विभागांमधील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तसेच हे त्रिसदस्यीय पथक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते यांच्यासोबतही बैठक घेणार आहेत.

त्यानंतर गुरुवारी (दि.१९)  निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. महाराष्ट्रातील निवडणूक दोन टप्प्यात पार पडू शकते. तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तयारीसाठी ३५ दिवसांचा कालावधी  हवा असतो, असे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय पथकाला सांगितले. दिवाळीच्या सूट्टीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले. यंदा महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.