केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको – मुख्यमंत्री

0
394

मुंबई,दि.८(पीसीबी) – राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकार काय काय पावलं उचलत आहे त्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी, केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज करु नका. सर्वांवर भार आहे, केंद्रावर आहे, राज्यांवर आहेच, पण प्रत्येक माणसावर भार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे जे कोणी या युद्धात उतरुन काम करत आहेत त्या सर्वांना धन्यवाद देतो. या सर्वांच्या सोबतीने आपण हे युद्ध लढत आहोत. आपण घरी बसून आहात, गैरसोय होतेय मला माहिती आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण घरी राहणंच योग्य आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.