Banner News

केंद्राची नियमावली जाहीर, काय सुरू काय बंद

By PCB Author

June 30, 2020

 

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) : केंद्र सरकारने एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनलॉक 2 अंतर्गत मोदी सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाऊन संपत आहे. अनलॉकचा पहिला टप्पा सध्या सुरू आहे. दरम्यान मोदी सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली आहे. ‘अनलॉक’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. अनलॉक 2 मध्ये असणारी नियमावली केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्याचीही गरज आहे.

अनलॉक 2 ची नियमावली

कंटेनमेंट झोनबाहेर खालील गोष्टींना बंदी असणार