Videsh

कॅमेरा सुर झाला अन् खासदार महाशय चक्क नग्न दिसले…

By PCB Author

April 16, 2021

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – कोरोनामुळे लॉकडाउन लागला आणि संपूर्ण जगाने वर्क फ्रॉम होमचा स्वीकार केला. एरव्ही बंद खोलीत होणाऱ्या बैठका ऑनलाइन होऊ लागल्या. एकीकडे याचा फायदा असताना काही तोटेही असून अशा अनेक घटना समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार कॅनडात घडला असून तेथील एका खासदाराला लाजिरवाण्या प्रकाराला सामोरं जावं लागलं आहे. व्हिडीओ मीटिंगदरम्यान चुकून लॅपटॉपचा कॅमेरा ऑन झाल्याने कॅनडाचे खासदार विल्यिअम एमस चक्क नग्नावस्थेत दिसले.

संसदेतील सदस्यांसोबत असणाऱ्या झूम कॉलवर विल्यिअम एमस सहभागी होणार होते. यावेळी विल्यिअम एमस सदस्स्यांना संबोधित करणार होते. मात्र बैठकीआधीच लॅपटॉपचा कॅमेरा ऑन झाला आणि विल्यिअम एमस नग्नावस्थेत दिसल्याने इतर सदस्यांना धक्का बसला. हे फीड फक्त कॅनेडियन संसदेच्या फीडवर प्रसारित करण्यात आल्याने सुदैवाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं नाही. ही घटना सार्वजनिक झाल्यानंतर विल्यिअम यांनी नंतर ट्विट करत याप्रकरणी माफीदेखील मागितली. “मी आज खूप मोठी चूक केली आणि नक्कीच त्यामुळे मला लाज वाटतीये,” असं विल्यिअम यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले आहेत की, “मी जॉगिंगवरुन आल्यानंतर ऑफिसचे कपडे घालत असताना कॅमेरा चुकून चालू राहिला. सभागृहातील माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी माफी मागतो. हे चुकून झालं असून यापुढे होणार नाही”.