कॅमेरा प्रेमीच वेड हे अजिबच…पठ्याने चक्क”कॅमेरा बंगलो”च बांधला .

0
373

मुंबई,14 (पीसीबी) : प्रत्येकाची इच्छा असते कि, आयुष्यात आपलं हक्काचं मनपसंत घर असावं आणि आपण आपल्याला हवं तस ते सजवाव. बेळगावच्या पठ्याने बांधलेला कॅमेरा बंगलो तुम्ही पाहिलात का? सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती फोटोग्राफर रवि होंगल यांच्या “कॅमेरा बंगलो”ची.

फोटोग्राफर रवि होंगल यांनी त्यांच्या घराची इमारत कॅमेऱ्याच्या डिझाइनमध्ये केली आहे. “कॅमेरा बंगलो” ची प्रत्येक बाजू हि कॅमेऱ्याच्या पार्ट सारखीच हुबेहूब डिझाईन केली आहे. कॅमेऱ्याचं डिझाईन आणि तसा आकार असलेलं घर असावं, अशी होंगल यांची इच्छा होती. त्यांच्या घराची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा सुरू आहे. रवी हे मूळचे कर्नाटकातील बेळगावचे रहिवासी आहेत. ते व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. त्यांना लहानपणापासूनच फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. ते जसजसे मोठे होत गेले तसतशी त्याची फोटोग्राफीची आवड हि वाढत गेली. त्यांनी आपल्या घराची कॅमेरा सारखी रचनाही केली. दूरवरुन बघितले तर जणू एखादा ब्रँडेड कॅमेरा उभा आहे, असा भास हे घर पाहताक्षणी झाल्याशिवाय राहत नाही. डोळे दिपऊन टाकणारा हा ब्रँडेड “कॅमेरा बंगलो” आहे.

कॅमेरा प्रेमी रवींनी आपल्या मुलांचीही कॅमेरावरून कॅनन, एप्सन आणि निकॉन अशी अतरंगी नाव ठेवली आहेत. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कॅमेऱ्याच्या आकारत हे घर आहे. त्यांचं कॅमेरा बद्दलच वेड आता त्यांच्या घरावरून हि दिसून येतंय.