अत्यंत धक्कादायक…कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप

0
463

मुंबई,दि.१२(पीसीबी) – एका तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. नातेवाईक असलेल्या या तरुणीने ओशिवारी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. एवढेच नाही तर तरुणीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीसाठी साद घातली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

पीडितेने 10 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 11 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी अर्ज स्वीकारला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरू होते. पुढे बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध धनंजय मुंडे यांनी शारीरिक संबंध ठेवले. तसेच व्हिडिओ काढून आपल्या धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्‌विट करून मदतीसाठी साद घातली आहे.

तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे कि, १९९७ मध्ये मी माझ्या बहिणीच्या घरी इंदोरला गेली होती. त्या वेळी मी १६-१७ वर्षांची होती. माझ्या बहिणीने १९९८ मध्ये मुंडे यांच्याबरोबर प्रेम विवाह केला होता. २००६ मध्ये ज्यावेळी माझी बहीण बाळंपणासाठी इंदोरला गेली होती त्यावेळी मुंडे याना मी घरी एकटीच आहे याची माहिती होती. त्यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता माझ्या घरी आले आणि माझ्या मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दर २-३ दिवसांनी ते येत राहिले. सर्वात कहर म्हणजे शरीर संबंध प्रस्थापित करतानाच विडिओ त्यांनी काढला. त्यानंतर मुंडे सारखे सारखे मला फोन करत होते. अश्या प्रकारे त्यांनी वारंवार माझ्यावर अत्याचार केला. असे तरुणीने तक्रार अर्जात म्हटलं आहे.