Maharashtra

कृष्ण प्रकाश यांच्याबद्दल व्हायरल पत्राची गृहसचिवामार्फत होणार चौकशी..

By PCB Author

May 12, 2022

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दोनशे कोटी उकळल्याच्या व्हायरल झालेल्या पत्राची राज्याच्या गृह सचिवांमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त त्यांनी दीड वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस दलातच नव्हे,तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली होता. या पत्रातील दाव्यानुसार या अवैध वसूलीत चार एसीपी आणि चार पत्रकार यांचाही हातभार आहे. आपले काळेधंदे उघड होऊ नयेत, तसेच आपली प्रतिमा उंचावलेली ठेवण्यासाठी या पत्रकारांना दरमहा लाखो रुपये दिले जात असल्याचा आरोप लेटरमध्ये करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांच्या कारभाराबाबत वक्तव्ये करणारी पत्र व्हायरल होण्याचा परंपरा कायम राहिली आहे. या आधीच्या आयुक्तांबाबतही अशीच पत्रे व्हायरल झाली होती. कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदावरून व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याआधीच त्यांच्यावर वार करण्यात आले आहेत. या पत्रामागे पोलिस दलातील वैमनस्य तर कारणीभूत नाही ना, अशीही चर्चा आहे. पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर 200 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर सध्या मुंबईचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली असून, व्हायरल होणारं हे पत्र खोटं असल्याचे म्हटले आहे. तसेच हे खोटे पत्र लिहणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार डोंगरे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.