कृती अहवाल विधिमंडळात सादर; मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण

0
344

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मराठा आरक्षण संदर्भातील कृती अहवाल  राज्याच्या विधिमंडळात  आज (गुरुवारी) सादर करण्यात आला. त्यानंतर दुपारी विधेयक मांडले जाणार आहे. कृती अहवालासोबत कायद्याची प्रतही देण्यात आली आहे. धनगर आरक्षणासंदर्भातही लवकरच पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या अहवालातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळण्याचे  स्पष्ट झाले आहे.