Desh

कुमारस्वामी यांचं सरकार संकटात, ११ आमदारांनी दिले राजीनामे

By PCB Author

July 06, 2019

कर्नाटक, दि ६ (पीसीबी) – कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस सरकारचे ११ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.  या ११ आमदारांनी राजीनामा दिल्यास मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारला काठावर बहुमत असेल, त्यामुळे कुमारस्वामी सरकार कधीही कोसळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

आमदारांच्या या राजीनाम्यांमुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारण कुमारस्वामींचे सरकार पडल्यानंतर भाजप इथे सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. गेल्या निवडणुकीत २२४ पैकी भाजपला १०४ , काँग्रेसला ८० आणि जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले होते.

दरम्यान, जर या आमदारांनी राजीनामे दिले आणि ते मंजूर झाले तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल आणि त्यांचा सत्ता स्थापनेसाठी दावा मजबूत होईल.