कुमारस्वामींचे येत्या गुरुवारी शक्तिप्रदर्शन, तिढा सुटणार?

0
309

बेंगळुरु, दि, १५ (पीसीबी) – बेंगळुरू: गेल्या दहा दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय ड्राम्यावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना येत्या गुरुवारी म्हणजे १८ जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली आहे. येत्या गुरुवारी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार असून यावेळी कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव जिंकतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांशी चर्चा करून विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. येत्या १८ जुलै रोजी विधानसभेत कुमारस्वामी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल. त्यानंतर या प्रस्तावावर मतदान होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आज कर्नाटक विधान परिषदेत जोरदार हंगामा झाल्याने विधान परिषदेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.