Desh

कुपवाडा येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत चार जवान शहीद

By PCB Author

March 01, 2019

कुपवाडा, दि. १ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये भारताचे चार जवान शहीद झाले आहेत. बाबागंद भागात चकमकी दरम्यान केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक, जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे दोन जवान या चकमकीत शहीद झाले.

चकमकीत दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे असे सुरक्षा दलांना वाटले होते. पण पाडलेल्या घराच्या ढिगाऱ्यामधून उठून या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये चार जवान शहीद तर आठ जण जखमी झाले आहेत.