कुदळवाडीत अग्निशमन विभाग, व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्याची मागणी

0
466

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – दिवाळी सणादरम्यान संभाव्य आगीच्या घटना टाळण्यासाठी कुदळवाडीत अग्निशमन विभाग, व्यापारी, नागरिक याची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी महापालिका अग्निशामक विभागाचे  प्रमुख  किरण गावडे  यांच्याकडे केली. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  अवघ्या आठ दिवसांवर  दिवाळी सण आला आहे. या पार्श्वभूमीवर आगीच्या संभाव्य घटना टाळण्यासाठी तसेच उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी   नागरिकांसोबत बैठक घेण्यात यावी. या बैठकीला  सर्व नागरिक ,व्यापारी यांना निमंत्रित करण्यात यावे,   अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान या निवेदनाची दखल घेत अग्निशामक विभागाचे प्रमुख  किरण गावडे यांनी बैठक घेण्यासाठी सहमती दर्शवली आहे.