कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकाकडून नाला बुजविण्याचा प्रयत्न स्विकृत सदस्याने उधळला  

0
1709

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – कुदळवाडी परिसतील पवारवस्ती येथील उड्डाणपूलाजवळील जुना नाला (ओढा) बुजविण्याचा प्रयत्न काही शेजारील भंगार व्यावसायिक आज (शुक्रवारी) करत होते. या प्रकाराची माहिती प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पिंपरी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मदतीने नाला बुजविण्याचे काम थांबवले.

कुदळवाडीत पावसाच्या आणि घरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी परिसातून अनेक प्रकारचे नाले (ओढा) बनवण्यात आले आहेत. आज (शुक्रवारी) पवारवस्ती येथील उड्डाणपूलाजवळील जुना जकात नाक्यासमोर जुना नाला (ओढा) बुजविण्याचा प्रयत्न काही शेजारील भंगार व्यावसायिक करत होते. या प्रकाराची माहिती प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव तेथील नागरिक चद्रकांत जाधव यांनी सांगितली.

यावेळी यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती पिंपरी महापालिकेचे संबंधित अधिकारी पोपट घावटे यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून नाला बुजविण्याचे काम थांबवले. “जर नाला बुजला असता तर, पावसाचे पाणी, गटारे, ड्रेनेज याचे पाणी कोठे सोडयचे?”, असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला असता. त्यामुळे  कुदळवाडीतील प्रत्येक नागरिकांनी जागृत राहून परिसरात घडणाऱ्या अनुचित प्रकाराची वेळीच दखल घेतली पाहिजे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.