Bhosari

कुदळवाडीतील पुठ्ठ्यांच्या गोदामाला भीषण आग

By PCB Author

June 29, 2019

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – चिखली, कुदळवाडीतील एका पुठ्ठ्यांच्या गोदामाला आज (शनिवार) दुपारी सव्वाएकच्या सुमारास आग लागली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

कुदळवाडी पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या एका पुठ्ठ्याच्या गोदामाला आग लागल्याने मोठे धुराचे लोट बाहेर पडत होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी  घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले आहे.

पिंपरीतील ३,चिखलीतील ५, तळवडेतील,५ भोसरीतील ४ आणि प्राधिकरणातील १ असे १४ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.