कुत्रा कोण आणि सिंह कोण? ओवैसींचा मोहन भागवतांना सवाल

0
735

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – कुत्रा कोण आणि सिंह कोण ?असा सवाल करून भारताच्या संविधानाने सगळ्यांना मानव मानले आहे. कोणालाही कुत्रा किंवा सिंह म्हटलेले नाही. आरएसएसचा संविधानावर विश्वास नाही, हीच त्यांची सर्वात मोठी अडचण आहे, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.

शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले होते की,  हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती करू शकेल. एखाद्या जंगलात जर सिंह एकटाच असेल तर जंगली कुत्री त्यावर झडप घालतात आणि सिंहाला नष्ट करतात. जग सर्वोत्तम करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे.   भागवत यांच्या या विधानाचा ओवैसी यांनी समाचार घेतला.

हिंदूंमध्ये वर्चस्व गाजवण्याची कोणतीही महत्वाकांक्षा नाही.  एक समाज म्हणून हिंदूंनी एकत्र यायला हवे आणि मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयत्न करायला हवेत,’ असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते.