कुठलाही आजार नसताना २१ वर्षाचा युवकाचा कोरोनामुळे मृत्यू

0
423

पुणे, दि. २५ (पीसीबी) – राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुणे शहरात कोरोमनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने एका 21 वर्षे तरुणाला जीव गमवावा लागला आहे. यापूर्वी कोणताही आजार नसताना केवळ निष्काळजीपणा या तरुणाच्या जीवावर बेतला. विशेष म्हणजे रुग्णालयात आणल्यानंतर केवळ अर्धा तासातच तरुणाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. कोरोनाची लक्षणे फक्त ताप, सर्दी, खोकला याशिवाय अनेक प्रकारची आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने या युवकाचा हकनाक बळी गेला अशी चर्चा आहे.

पुण्यातील गुलटेकडी परिसरात हा तरुण राहत होता. या तरुणाला 15 मे पासून त्रास होत होता. त्या तरुणाला कोरोनाची लक्षण आढळून आली होती. मात्र या त्रासाकडे आणि लक्षणांकडे त्याने दुर्लक्ष केलं. मात्र श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. म्हणजे लक्षण आढळल्यानंतर सात दिवस त्याने घरीच राहत अंगावर दुखणे काढलं. शुक्रवारी 22 मे रोजी श्वसनाचा त्रास वाढल्यानं सायंकाळी 7.30 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आलं‌. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर केवळ अर्धा तासात म्हणजे 8 वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनामुळे त्याची श्वसन व्यवस्था कोलमडली. निमोनियामुळे त्या तरुणाचा जीव गेला. त्यानंतर त्याचा 23 मे रोजी रात्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. विशेष म्हणजे या तरुणाला यापूर्वी कोणताही आजार नव्हता. केवळ कोरोना लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं तरुणाचा जीव गमवावा लागला.