कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्याने पोटच्या मुलीला घातल्या गोळ्या

0
565

दिल्ली, दि. १० (पीसीबी) – कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे पोटच्या मुलीलाच गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील दस्तमपूर येथे घडली.

निशा पुत्री असे मृत तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निशाने धनसिया येथील सुनील कुमार याच्याशी २०१८ मध्ये जून महिन्यात कोर्ट मॅरेज केले होते. लग्न केले होते, तेव्हा ते दोघेही अल्पवयीन होते. त्यामुळे निशाचा भाऊ संदीर, सुशील, काका सत्य प्रकाश आणि तिचे वडील नाखुष होते. ते तिला मारहाण करत असल्याचा आरोपही तिच्या पतीने केला आहे. सुनीलच्या कुटुंबीयांनी निशाला स्वीकारले होते. मात्र, निशाचे आईवडील तिच्यावर नाराज होते. अशातच ती तिच्या माहेरी गेली होती. गुरुवारी (४ जूलै) रात्री तिच्या कुटुंबीयांनी तिच्या हत्येचा कट रचला आणि तिच्यावर गोळी झाडुन तिची हत्या केली. गोळीच्या आवाजाने आजुबाजूचे नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी निशाच्या कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.