‘किवी’ म्हणजे आरोग्याचं वरदान लाभलेलं फळ…

0
552

आज कालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला फास्टफूड खाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे घरातील सकस आहार किंवा पालेभाज्या, फळे खाण्यास प्रत्येक जण टाळाटाळ करताना दिसतो. शरीराच्या योग्य वाढीसाठी आहारात सगळ्या पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. त्यामुळे कडधान्य, फळे अशा सगळ्याचा आहारात समावेश करा असं डॉक्टर वारंवार सांगतात. अनेक जण फळं खाण्यास कंटाळा करतात. मात्र, प्रत्येक फळामध्ये खास गुणधर्म असतात. जे शरीरासाठी फायद्याचे असतात. त्यामुळेच आज किवी खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या…१. संधिवाताची समस्या किवी कमी होते.

२. किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

३. शरीरातील कमकुवत पेशींना किवी सुदृढ बनवण्याचे काम करते

४. आमवात, दमा या रोगांवर किवी गुणकारी आहे.

५. मधुमेहींसाठी किवी अत्यंत फायदेशीर आहे.

६.किवी सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.

७. जखम लवकर भरुन निघते.

८. पचनक्रिया सुधारते.

(हि वरील माहिती वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व आपल्या कौटुंबिक डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.