किवळे येथे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात सोलापूरचे पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड जखमी

0
441

किवळे, दि. १८ (पीसीबी) – द्रुतगती मार्गाने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे स्टेअरींग लॉक झाल्यामुळे ती रस्त्याच्या कडेलेल्या असलेल्या कठड्याला धडकून अपघात झाला. यामध्ये सोलापूर शहरचे पोलिस उपायुक्त मधुकर गायकवाड आणि त्यांचे दोन सहकारी जखमी झाले आहेत. ही घटना आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास किवळे एक्झीटजवळ घडली.

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास सोलापुर शहराचे उपायुक्त मधुकर गायकवाड हे त्यांच्या दोघा सहकाऱ्यांसोबत (एमएच/१६/बीवाय/२५१२) या क्रमांकाच्या कारने किवळे येथील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जात होते. त्यांची कार किवळे येथील एक्झीटजवळ आली असता कारचे स्टेअरींग लॉक झाले आणि कार थेत रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला जाऊन धडकली. यामध्ये गायकवाड यांच्या डाव्या हाताला जबर मार लागला आहे. तर अन्य दोघे सुखरूप असून त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. गायकवाड यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड पोलिस तपास करत आहेत.