किरीट सोमय्यांचे काम करण्यास सांगू नका; उध्दव ठाकरेंना शिवसैनिकांची विनंती

0
1061

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचे काम करण्यास सांगू नका. प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या विरोधातच काम करतील, असे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सांगितले.   

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत युती झाली, आणि  सौमय्या लोकसभेचे उमेदवार असतील, तर त्यांचे काम करण्यास कडाडून विरोध दर्शवला. सौमय्यांना एकही शिवसैनिक मतदान करणार नाही.त्यांच्या विरोधात सर्व शिवसैनिक एकदिलाने  काम करतील. पक्षाने कारवाई केली, तरी विरोधातच काम करणार, असा निर्धार कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या समोर केला.

ईशान्य मुंबईत शिवसेनेची संघटनात्मक  ताकत आहे. त्यामुळे भाजपला स्वबळावर हा मतदारसंघ लढवणे  कठीण आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या समोर मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कारभारावरून सोमय्या यांनी थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष करत टीका केली होती.