किराणा दुकानातून गहू, आईस्क्रीम आणि श्रीखंड चोरीला

0
233

आळंदी, दि. २७ (पीसीबी) -चोरटे काय चोरून नेतील याचा काही नेम नाही. हनुमानवाडी केळगाव येथे एका किराणा मालाच्या दुकानात चोरी करून चोरट्यांनी गव्हाच्या गोण्यासह श्रीखंड आणि आईस्क्रीम चोरून नेले आहे. ही घटना रविवारी (दि. 25) सकाळी उघडकीस आली असून सोमवारी (दि. 26) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक दशरथ मुंगसे (वय 27, रा. हनुमानवाडी, केळगाव) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे हनुमानवाडी केळगाव येथे ज्ञानाई सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडले. दुकानातून तीस किलो वजनाच्या गव्हाच्या 12 गोण्या तसेच फ्रीजमध्ये ठेवलेले आईस्क्रीम आणि श्रीखंड असा एकूण 12 हजार 798 रुपये किमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.