किरकोळ खर्चासाठी साठी उसने पैसे न दिल्याने साडूने डोक्यात घातला कोयता

0
285

चिखली, दि. १४ (पीसीबी) – वारंवार पैसे मागणा-या साडूला पैसे देण्यास नकार दिला. यावरून साडू त्याचा मुलगा आणि अन्य एकाने मिळून पैसे देण्यास नकार देणा-या नातेवाईकाला दगडाने, हाताने मारहाण केली. तसेच कोयत्याने डोक्यात मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. १२) रात्री साडेआठ वाजता धर्मराजनगर, चिखली येथे घडली.

राहुल केरू गायसमुद्रे (वय ३३, रा. धर्मराजनगर, चिखली) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नवनाथ वाघमारे, शिवम नवनाथ वाघमारे (दोघे रा. धर्मराजनगर, चिखली) आणि सतीश सरवदे (रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ हा फिर्यादी यांचा साडू आहे. दोघेजण शेजारीशेजारी राहतात. नवनाथ हा फिर्यादी यांच्याकडे वारंवार पैसे मागत होता. शनिवारी त्याने पुन्हा पैसे मागितले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.

त्यानंतर फिर्यादी त्यांच्या लहान मुलीसोबत बाहेर फिरायला गेले. बाहेर गाठून आरोपी नवनाथ आणि त्याचा मुलगा शिवम यांनी फिर्यादी यांना धमकी दिली. रात्री साडेआठ वाजता तिन्ही आरोपींनी फिर्यादी यांना दगडाने, हाताने मारहाण केली. तर आरोप सतीश याने लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.