किरकोळ कारणावरून एकास कोयता, रॉड, दगडाने मारहाण

0
313

बोपखेल, दि. २० (पीसीबी) – ‘मोठ्याने बोलू नका’, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एका तरुणाला कोयत्याने, लोखंडी रॉडने आणि दगडाने मारहाण केली. ही घटना बोपखेल येथे मंगळवारी (दि. 18) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

अनिल बालाजी सोनवणे (वय 23, रा. शितलादेवी चौक, बोपखेल) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय उर्फ अज्जू वाघ, विनोद रमेश वाघ आणि राज गरांडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही. सर्व राहणार शिवनेरी कॉलनी, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय आणि विनोद हे दोघे भाऊ फिर्यादी यांच्या घरासमोर राहतात. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास आरोपी अजय मोठमोठ्याने बोलत होता. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीने त्यास मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. तसेच ही बाब आपल्या पतीला सांगितली. यामुळे फिर्यादी हे आरोपीस विचारणा करण्यासाठी गेले.

त्यावेळी झालेल्या भांडणातून आरोपी गरांडे याने कोयत्याने फिर्यादी यांच्या हातावर मारले. तसेच आरोपी अजय याने लोखंडी रॉडने मारहाण केली तर आरोपी विनोद याने फिर्यादी यांना दगड फेकून मारून जखमी केले. पोलीस हवालदार सुरेश मुंढे तपास करीत आहेत