Videsh

किम जोंग उनच्या क्रूरतेचा कळस; जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकले

By PCB Author

June 12, 2019

प्योंगयोंग, दि. १२ (पीसीबी) – उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचे कारनामे जगाला हादरवून सोडणारे असतात. सध्या त्याच्या क्रूरतेचे आणखी एक उदाहरण चर्चेत आहे. ब्रिटनमधील एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, किमने आपल्या एका जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकून मृत्यूदंड दिला. पिराना हा जगातील सर्वात हिंस्र मासा समजला जातो.

किमने प्योंगयोंगमधील आपल्या रॉन्गसॉन्ग या निवासस्थाळी एक मोठा तलाव बनवलेला आली. या तलावात माणसांना आपल्या दातांनी जिवंत फाडून खाणाऱ्या पिराना माशांना पाळले आहे. जनरल आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा संशय आल्याचं लक्षात येताच, किमने त्याचे हात आणि धड वेगळे केले आणि पिराना माशांच्या तलावात फेकले.

मात्र जनरलचा मृत्यू पिराना माशांच्या हल्ल्यात झाला की त्याआधीच, हे अद्याप समजू शकलेले नाही. किमच्या या क्रूरतेची चर्चा केवळ उत्तर कोरियातच नाही तर जगभरात आहे. मात्र या जनरलचे नाव वृत्ता प्रकाशित केलेले नाही.