किम कर्दाशिअन फर्स्ट लेडी झाली तर…

340

वॉशिंग्टन दि. ५ (पीसीबी) – यंदाची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयश आलेल्या ट्रम्प यांना अमेरिकन जनता राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार व्हायला भाग पाडणार, असे कयास आत्तापासून बांधले जात आहे. अशातच प्रसिद्ध गायक केन वेस्ट याने आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यानंतर सोशल मीडियावर केन वेस्टची पत्नी किम कर्दाशिअन हिच्याविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. किम कर्दाशिअन अमेरिकेची फर्स्ट लेडी झाली तर काय होईल, याची मजेशीर मिम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Aके
केनके केनकेके केन वेस्टच्या उमेदवारीला उद्योगपती एलॉन मस्क यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. तर किम कर्दाशिअन हिनेदेखील केनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. केन वेस्ट याने २०१५ सालीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. अखेर यंदा त्याने राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर केनच्या उमेदवारीपेक्षा किम कर्दाशिअन फर्स्ट लेडी झाली तर काय होणार, याचीच तुफान चर्चा सुरु आहे. केन वेस्ट आणि किम कर्दाशिअन हे जोडपे कायमच चर्चेत राहिले आहे. २०१४ साली या दोघांनी विवाह केला होता.

दरम्यान, यंदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येचा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांमध्ये ट्रम्प यांच्याविषयी रोष उत्त्पन्न झाला आहे. या मुद्द्यावरून अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीरपणे लक्ष्य केले होते.