किती जागा येतील, हे सांगायला मी ज्योतिषी नाही, आणि पोपटालाही विचारलेले नाही – अजित पवार  

0
917

पुणे, दि. २२ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अंदाजावर आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत आमच्या किती जागा येतील, हे सांगायला मी काही ज्योतिष नाही किंवा पोपटलाही त्याबाबत विचारलेले नाही,  असे  पवार यांनी सांगितले.  

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट हा `अंडर करंट` होता, तो आधी कुणालाही  समजला नाही.   भाजपला, आम्हाला ना मीडियाला समजला.  यावेळी काय अंडरकरंट काय ते मला कळला असता तर.., असे म्हणत अजित पवारांनी त्यावर एक्झिट पोलचे अंदाज खरेच ठरतील, असे वाटत नाही, असे सांगितले.  लोकसभेच्या निकालाचा अंदाज व्यक्त करणे  अवघड आहे, असे ते म्हणाले .

मुंबईतील भाजपच्या काही उमेदवारांनी निकालाच्या आधीच लाडू तयार केले आहेत. यावर अजित पवार म्हणाले की, लाडू कुणी तयार करावेत ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र, यामधून त्यांचा अति आत्मविश्वास दिसून येत आहे, असे  पवार म्हणाले.