कितीही विरोध झाला तरी आता माघार नाही – अमित शहा

0
548

नवी दिल्ली,दि.२२(पीसीबी) – सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध सुरु असला तरी माघार घेतली जाणाार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. सीएएच्या मुद्यावरून अमित शहा यांनी पुन्हा विरोधकांना लक्ष केलं आहे.

अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभेत या कायद्याच्या अंमलबजावणीचा पुनरुच्चार केला आहे. या कायद्यात देशातील कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. मात्र, या कायद्याबाबत काँग्रेससह विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका अमित शहा यांनी केली आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्य हिेंदूंना नागरिकत्व द्यावं, अशी सूचना याआधीही काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती, असंही अमित शहांनी म्हटलं. विरोधकांनी आपल्याशी जाहीर चर्चेला समोर यावं, असं आव्हानही शहांनी दिलं आहे.