Maharashtra

कितर्नकार इंदुरीकर महाराजांना सायबर सेल कडून मिळाला मोठा दिलासा

By PCB Author

February 25, 2020

नगर, दि.२५ (पीसीबी) –  इंदुरीकर महाराज यांच्यावर कितर्न करताना एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होता.   त्यावरुन आरोग्य विभागाने त्यांना नोटीसही पाठवली होती. आपण कितर्नात असे कुठलेही वादग्रस्त वक्तव्य केले नव्हते असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते.   सिद्ध कितर्नकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंदुरीकर महाराज यांच्या त्या वादग्रस्त किर्तनाचा व्हिडीओ यूटयूबवर उपलब्ध नसल्याचा अहवाल सायबर सेलने दिला आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराज यांनी ओझर येथे केलेल्या किर्तनात वादग्रस्त विधान केलं होतं. त्या वक्तव्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तशी तक्रार अहमदनगर जिल्हा शल्य चिकित्सकांडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर आरोग्य विभागानं इंदुरीकर महाराजांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

आरोग्य विभागा ने पाठवलेल्या नोटिशीला इंदुरीकर महाराजांनी शेवटच्या दिवशी वकिलांमार्फत उत्तर दि ले . “ मी ते वाक्य बोललोच नाही. मी अ से कीर्तन के ले च नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तनच के ले नाही. मी समाज प्रबोधन करत असल्या ने मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसेच इतर ठिकाणाहून देखील पुरस्कार मिळाले आहेत. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही,” असा खुलासा इंदुरीकर महाराजांनी केला होता.