Desh

किंग खानबरोबर काम करण्याची इच्छा- विद्या बालन

By PCB Author

August 24, 2019

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – किंग ऑफ रोमान्स शाहरुख खानबरोबर काम करायला मिळावे ही प्रत्येक हिरॉइनची इच्छा असते. विद्या बालननेही अलीकडेच ही इच्छा व्यक्त केली. विद्या आजवर शाहरुखबरोबर केवळ दोन गाण्यांमध्ये दिसली आहे.

याबाबत माध्यमांशी गप्पा मारताना ती म्हणाली, की ‘शाहरुखला मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मी स्तंभित झाले होते. शाहरुखचे व्यक्तिमत्त्व जादूई आहे. त्याच्याबरोबर काम करणे हा विलक्षण अनुभव असू शकतो. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाली, तर किंग खानबरोबर काम करण्याची तीव्र इच्छा आहे.’