काही लोक काम करून मोठे होतात, तर काही लोक केवळ श्रेय घेतात; सोनिया गांधींचा मोदींना टोला 

0
509

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ कामांचे श्रेय घेण्याचे माहीत आहे, काम करणे  नाही,  असा टोला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज (सोमवार) येथे लगावला. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे  आयोजन केले होते.  याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.  जगभरात मनमोहन सिंग यांची ओळख ही त्यांच्या कामामुळे झाली आहे.  काही लोक काम करून मोठे होतात. तर काही लोक केवळ श्रेय घेतात,  असा टोला  त्यांनी मोदींना लगावला.

मनमोहन सिंग  यांनी पंतप्रधानपदावर दहा वर्षे काम केले. मात्र, त्यांनी कधीही स्वतःचा प्रचार केला नाही. तसेच कोणत्याही कामाचे श्रेय त्यांनी घेतले नाही. त्यांनी इंदिरा गांधींसोबत सुमारे पंधरा वर्षे काम केले. मात्र, मनमोहन सिंग हे आत्मस्तुती करणारे नेते नाहीत.  त्यांनी आपल्या कामाचा जगापुढे आदर्श ठेवला, असेही सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.