Maharashtra

काही भागात लॉकडाऊन शिथील करता येईल का?, शरद पवारांची पंतप्रधान मोदींना विचारणा

By PCB Author

April 09, 2020

मुंबई,दि.९(पीसीबी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी “काही ठिकाणचं लॉकडाऊन शिथील करता येतं का ते बघावं” अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘कोरोना’ या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे.

यावेळी केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे, अशी सूचनाही पवारांनी यावेळी केली आहे. ‘कोरोना’ साथीला आटोक्यात आणल्यानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.