काही झाले तरी काँग्रेससोबत युती करणार नाही – मायावती

0
433

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – काही झाले तरी काँग्रेससोबत युती करणार नाही असे बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसवर हल्लाबोल करताना मायावती यांनी म्हटले आहे की, ‘मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत युती करणार नाही’. ‘राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन्हीकडे आम्ही एकतर प्रादेशिक पक्षांसोबत युती करु अन्यथा स्वतंत्र लढू. पण काँग्रेससोबत जाणार नाही’, असे मायावती पत्रकार परिषदेदरम्यान बोलले आहेत.

भाजपाचा पराभव करणे हा काँग्रेसचा हेतू नसून आपल्या मित्र पक्षांना दुखावणे हा मुख्य हेतू असल्याची टीका मायावती यांनी केली आहे. काँग्रेस भाजपाचा नाही तर आपल्या मित्रांचा पराभव करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘काँग्रेसचा अहंकार बोलत असून त्यांना आपण एकटे भाजपाचा पराभव करु असे वाटत आहे. पण सत्य हे आहे की सत्तेत असताना केलेल्या भ्रष्टाचारासाठी लोक त्यांना अजूनही माफ करायला तयार नाहीत’, असे मायावती यांनी म्हटले आहे.