Sports

काही झाले तरी ऑलिंपिक स्पर्धा होणार

By PCB Author

February 02, 2021

टोकियो, दि. २ (पीसीबी) – करोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर जपानमधील परिस्थिती कितीही खराब असली तरी जुलै महिन्यात येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा आम्ही घेणारच असे स्पष्ट प्रतिपादन जपान संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी केले. आम्ही सातत्याने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या संपर्कात असून, त्यांना येथील प्रत्येक घडामोडीची तसेच परिस्थितीची माहिती देत आहोत.

करोनाची परिस्थिती काय आणि कशी असेल याचा विचार न करता आम्ही ऑलिंपिक स्पर्धा घेणार आहोत. आम्ही स्पर्धा कुठे नाही, तर टोकियोमध्येच कशी घेता येईल यावर लक्ष्य केंद्रित केले आहे, असे ही त्यांनी सांगितले.  स्पर्धेचे आयोजन करताना आम्ही काही वेगळ्या वाटांचा विचार करणार आहोत. एकत्र काम करण्यास कितीही अडचणी येत असल्या तरी संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती यांचे नाते घट्ट आहे, असे ही त्यांनी नमूद केले.

गेल्या वर्षी करोनाच्या वैश्विक संकटामुळेच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता जपानमध्ये करोना संसर्गाची परिस्थिती बिकट असून काही राज्यात आणिबाणी जाहिर केली आहे. त्यामुळे या वेळी देखिल होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलल्या जाणार की रद्द होणार या विषयाच्या चर्चेने जोर धरला आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष मोरी यांनी आज केलेल्या वक्तव्या वरून तुर्तास तरी ही चर्चा थांबेल असे वाटत असले, तरी या संदर्भात संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला लवकरच आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, असे वाटते.