‘काहीही करा पण आम्हाला उभं करा’; पुरग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे कळवळीची मागणी

0
169

चिपळूण, दि.२५ (पीसीबी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेचं म्हणणं ऐकून घेत, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी अनिल परब, भास्कर जाधव, उदय सामंत, सीताराम कुंटे यांची देखील उपस्थिती होती. तसेच, स्थानिक प्रशासनासोबत मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर नक्कीच काहीतरी मदतीची घोषणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागरिकांच्या भावाना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज चिपळूण बाजारपेठेत दाखल झाले तेव्हा, काही नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर देखील दिसून आला.