कासारसाई बलात्कार प्रकरण: आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

0
550

हिंजवडी, दि. २१ (पीसीबी) – उसतोड मजुरांच्या दोघा १२ वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने त्यातील एकीचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुरुवारी (दि.२०) आरोपी गणेश निकम (वय २२, रा. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, कर्मचारी वसाहत, कासारसाई) आणि त्याच्या अल्पवयीन १६ वर्षीय साथीदाराला अटक केली. गणेश याला शिवाजीनगर कोर्टात हजर केले असतान कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.