कासारसाई आणि पिंपरीतील मुलीवरील अत्याचाराच्या घटना दुर्देवी – विजया रहाटकर

0
563

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – हिंजवडीतील कासारसाई परिसारातील झालेल्या मुलीवरील अत्याचार आणि पिंपरीतील एचए मैदानावरील सापडलेला चिमुकलीचा मृतदेह ह्या दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. आज (शुक्रवारी) पिडीत कुटुंबियाची भेट घेवून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात जावून घटनेची माहिती घेत असताना त्यांनी सांगितले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, उमा खापरे यांच्या इतर पदाधिकारी उपस्थित होते. हिंजवडी आणि पिंपरीतील घटना अत्यंत निंदनीय आहेत. या घटनेचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा बाहेरच्या राज्यात तपास पथक रवाना झाले आहे. या घडलेल्या दुर्दैवी घटनेकडे राज्य आयोगाचे लक्ष्य आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.