Notifications

कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ महिलेला ३६ लाखांच्या ब्राऊन शुगरसह अटक

By PCB Author

March 24, 2019

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – विक्रीसाठी आणलेली ३६ लाख रुपये किमतीची ३०० ग्रॅम वजनी ब्राऊन शुगरसह एका महिलेला अमली पदार्थ विरोधी पथक आणि दरोडा विरोधी पथकाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत अटक केली. ही कारवाई  शनिवारी (दि.२३) सकाळी पावणेअकराच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळील जुना पुणे-मुंबई हायवेच्या उड्डाण पुलाखालील फुटपाथवर करण्यात आली.