कासारवाडीत रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू

0
595

कासारवाडी, दि. ७ (पीसीबी) – रेल्वेरुळ ओलांडत असताना इंटरसिटी एक्सप्रेसची जोरदार धडक बसल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडी रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली.

मृताजवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे नसल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

पिंपरी लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कासारवाडी रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वेरुळ ओलांडत असताना इंटरसिटी एक्सप्रेसच्या जोरदार धडकेने एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृताचे वर्णन पुढील प्रमाणे वय अंदाजे ५५ वर्ष, रंगा सावळा, केस काळे-पांढरे अर्धे टक्कल, अंगात पांढरा-लाल रंगाचा पूर्ण बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणाच्याही परिचयाची असल्यास त्यांनी त्वरीत पिंपरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास पिंपरी लोहमार्ग पोलिस करत आहेत.