कासारवाडीत भंगाराचे दोन दुकान जळून खाक

0
439

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कासारवाडी येथील दोन भंगारच्या दुकानाला लागलेल्या आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास कासारवाडी येथील रेल्वेगेटजवळ घडली.

अग्निशामक दलाच्या जवाणाने दिलेल्या माहितीनुसार, कासारवाडी येथील रेल्वे गेटजवळ असलेल्या दोन भंगारांच्या दुकानांना मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी अग्निशामक दलाचे दोन, भोसरी आणि रहाटणी यांचे प्रत्येकी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एक तासात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग कशामुळे लागली याचे  नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.