कासारवाडीत दुचाकी डिव्हायडरला धडकून तरुणाचा मृत्यू

0
390

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी स्पीड ब्रेकरवरुन उडून डिव्हायडरला धडकली. या घटनेत जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी स्माशानभुमी रस्त्यावरील हॉटेल किनाराजवळ घडली.

कुंदन रमेश मोरे (वय २७, रा. गोविंद पॅलेस, काळेवाडी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि.१०) डिसेंबर २०१८ रात्री बाराच्या सुमारास कुंदन हा त्याच्या ताब्यातील दुचाकी ही भरधाव वेगाने चालवून कासारवाडीतील स्मशानभुमीच्या रस्त्याने चालला होता. यावेळी दुचाकीवरील त्याचा ताबा सुटला, दुचाकी स्पीड ब्रेकरवरुन उडून डिव्हायडरला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीस्वार कुंदन हा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.