Pimpri

कासारवाडीत दत्त जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

By PCB Author

December 13, 2018

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – दत्त जयंती निमित्त कासारवाडी येथील दत्त साई सेवा कुंज आश्रम (मंदिर) येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. १४ डिसेंबरपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. त्याचप्रमाणे आश्रमात २३ डिसेंबरपर्यंत कीर्तन महोत्सव सुरू राहणार आहे.

यावेळी महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उद्योजक विजयशेठ जगताप, माऊली जगताप, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे, आदिती निकम, नगरसेवक हर्षल ढोरे, शशिकांत कदम, सागर आंघोळकर, उषा मुंडे, अंबरनाथ कांबळे, विलासराव लांडे, सुनिल येडे, डॉ. देविदास शेलार,संजय मराठे, गणेश सोनवणे, ज्ञानेश्वर खैरे, मारुती कवडे, सुरेश शिंदे, भाऊ कानकात्रे आदी उपस्थित होते.

या महाआरोग्य शिबीरात आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, लायन्स क्लब ऑफ पुणे आर्य या रुग्णालयांनी कर्करोग, अस्थिरोग, नेत्र तपासणी, नाक, कान, घसा, शुगर, रक्तदाब, इसीजी, गर्भाशय कर्करोग, हिमोग्लोबिन तपासणी इतर शस्त्रक्रिया तसेच मोफत उपचार व माहीती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिबीराच्या पहिल्याच दिवशी ६२१ मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच १ हजार २७६ गरजू नागरिकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.