कासारवाडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
1106

कासारवाडी, दि. ६ (पीसीबी) – अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२२ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास कासारवाडी येथील हॉटेल कलासागरसमोरील रस्त्यावर घडली.

मगन चिनकुमल तलरेजा (वय ५६, रा. औंदुंबर सोसायटी, फ्लॅट नं.४०, पाचवा मजला, पिंपरीगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी कोमल मगन तलरेजा (वय २७, औंदुंबर सोसायटी, फ्लॅट नं.४०, पाचवा मजला, पिंपरीगाव) यांनी बुधवारी (दि.५) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गुरुवारी (दि.२२ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास मगन तलरेजा हे त्यांच्या दुचाकीवरुन पुण्याकडे कामाला निघाले होते. ते कासारवाडी येथील हॉटेल कलासागरसमोरील रस्त्यावरुन जात असताना अज्ञात वाहन चालकाने त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाले. घटनेत गंभीर जखमी झालेले मगन तलरेजा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालका विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गाडे तपास करत आहेत.