कासारवाडीतील विसर्जन घाटाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

0
716

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कासारवाडी येथे पवना नदीघाटावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन व कोनशीलाचे अनावरण महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १४)करण्यात आले.

यावेळी फ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, ई प्रभाग अध्यक्ष भीमा फुगे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, माई काटे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, स्वीकृत नगरसेवक माऊली थोरात, कुणाल लांडगे, प्रभाग अधिकारी आशा राऊत, शहर अभियंता अंबादास चव्हाण, संजय कणसे, संजय शेंडगे, किरण शिंदे, राजू पठारे,चंद्रकांत जाधव, लतिफ शेख, यशवंत गंभिरे, मंदा गावटे, शोभा सिंग, मिनल जोशी, गोरख जवळकर, वंदना जवळकर, संजय जवळकर आदी उपस्थित होते.

कासारवाडीत गणपती विसर्जन घाट असावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून नागरीक करत होते. कासारवाडीतील नागरिकांना आजपर्यंत गणपती विसर्जन हे स्मशानभूमीच्या मार्गातून करावे लागत होते. आजच्या या गणपती घाटामुळे तेथील नागरिकांना गणपती विसर्जन आणि नवरात्रातील घट विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कासारवाडीतील या घाटाला कै. महिपती सखाराम जवळकर असे नाव देण्यात आले आहे. या घाटाच्या उभारणीसाठी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी पाठपुरावा केला. तसेच त्यांच्याच संकल्पनेतून या घाटाची उभारणी करण्यात आली. घटाच्या उभारणीनंतर आज (शुक्रवारी) दीड दिवसाच्या गणपतीचे महापौरांच्या हस्ते आरती करून विसर्जन करण्यात आले.