कासवाचा विसाव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू, अखेर ‘त्या’ मालकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल

0
243

मुंबई, दि.१२ (पीसीबी) :प्राण्यांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार ठाण्यामध्ये उघडकीस आला आहे. ठाण्यामध्ये एका इमारतीच्या आवारात एक पाळीव कासव मृतावस्थेत आढळले होते. कासवाचा मालक त्याची योग्य देखभाल करतद नसल्याने विसाव्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सुनिष सुब्रमण्यन कुंजू या भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डचे कल्याणमधील मानद जिल्हा पशु कल्याण अधिकारी यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 1 मे रोजी त्यांच्या हेल्पलाईनवर ठाणे माजिवडामधील हायलँड हेवन कोरल बिल्डिंगच्या आवारात एक कासव मृतावस्थेत असल्याची माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच कुंजू यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. इमारतीमधील प्रतीक उत्तम चौरे यांनी रेड अर्न टर्टल जातीचे कासव पाळले होते. मात्र, त्यांनी त्याची योग्य ती देखभाल केली नाही. त्यामुळे कासव विसाव्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्राण्यांवर अत्याचार आणि त्यांच्या छळाबाबत तक्रार दाखल करून याचा तपास करण्याची मागणी कुंजू यांनी केली आहे.