काश्मीर नको विराट कोहली द्या

0
738

इस्लमाबाद, दि. २० (पीसीबी) – ‘फादर्स डे’ ला भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा ८९ धावांनी दारूण पराभव केला. मानहानीकारण पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी सोशल मीडियावर संघाला चांगलेच ट्रोल केले. रविवारपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये पाकिस्तानी चाहते ‘काश्मीर नको विराट कोहली द्या’ असा बॅनर घेऊन मागणी करत आहेत. काही आंदोलन कर्त्यांच्या हातात पाकिस्तानी झेंडेही दिसत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर सोशल मीडियावर या फोटोची चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात या फोटोमागील सत्या काय आहे काय आहे.

वरील फोटो फोटो गुगलवर सर्च केल्यानंतर विविध परिणामामध्ये इंडिया टुडेची एक बातमी मिळाली. त्या बातमींमध्ये याच्याशीच मिळताजुळता फोटो मिळाला. मात्र, त्यामध्ये विराट कोहली द्या असे लिहलेला बॅनर नाही. तर त्यावर WE WANT AZAADI असे लिहलेले आहे. याचा अर्थ या फोटोला मॉर्फ केले आहे.

हा फोटो ८ ऑगस्ट २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीमधील आहे. ज्यामध्ये दक्षिण काश्मीरमधील कुलगामा जिल्यातील एखा गावातील काही लोकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. पाकिस्तान, लश्कर-ए-तय्यबा, हिजबुल कमांडर बुरहान वानी च्या समर्थनार्थ आंदोलन करत असल्याचे त्या बातमीतून स्पष्ट होतेय. ८ जूलै २०१६ रोजी भारतीय लष्कराने बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्यानंतर काश्मीरमधील अनेक लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते.