Desh

काश्मीरमध्ये रमजान ईददिवशी वातावरण तणावपूर्ण; तरूणांची दगडफेक

By PCB Author

June 16, 2018

श्रीनगर, दि. १६ (पीसीबी) – जम्मू काश्मीरमध्ये रमजान ईदनिमित्त आज (शनिवारी) नमाज करण्यात आली. त्यानंतर काही तरूणांनी लष्कराच्या जवानांवर तुफान दगडफेक केली. त्यांच्या हातात दहशतवादी संघटना आयएसआयएस आणि पाकिस्तानचे ध्वज होते. तसेच त्यांनी पाकिस्तान झिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या तरूणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराने अश्रूधुराचा वापर करून तरूणांना पांगविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पाकिस्तानकडून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे गोळीबार करण्यात आला, यात जवान विकास गुरुंग शहीद झाले. जम्मू मधील अरनिया सेक्टरमध्ये  आज सकाळी ४ वाजता  पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यास बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिले. सांबा सेक्टरमध्ये दोन पाकिस्तानी तरुणांना अटक करण्यात आली आहे.

शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे अटारी सीमेवर तणावाचे वातावरण आहे. दरवर्षी ईदच्या निमित्ताने बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्स हे एकमेकांना मिठाई देतात, ही आदान-प्रदान यंदा झालेली नाही. दरम्यान, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी ‘ईद हा आनंदाचा सण आहे. या निमित्ताने काश्मीरमध्ये शांतता नांदावी, अशी दुआ मागितली आहे.